You are currently viewing फोंडाघाट मध्ये निघालेल्या भा.ज.प. व शिंदे गट यांच्या युतीच्या महारॅलीने विरोधकांना चपराक

फोंडाघाट मध्ये निघालेल्या भा.ज.प. व शिंदे गट यांच्या युतीच्या महारॅलीने विरोधकांना चपराक

फोंडाघाट

फोंडाघाट मध्ये आज भा.ज.प.आणि शिंदे गट यांच्या युतीची महारॅली काढण्यात आली. रॅली इतकी भव्य होती की विरोधकांना चपरात बसला. सरपंच पदाचे उमेदवार सौ.संजना संजय आग्रे आणि सर्व वाॅर्ड उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन झाले. मागील ५ वर्षात आमदार श्री.नितेशजी राणे यांच्या नियंत्रणाखाली झालेली कोट्यावधी रुपयांची कामे यांचा आलेख मतदारांसमोर ठेवला गेला.

आमदार नितेश राणे यांनी जबाबदारी सोपवलेले सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी व सर्व उमेदवार सरपंच पदाचे उमेदवार जि.प.सदस्य संजय आग्रे.राजु पटेल संदेश पटेल विश्वनाथ जाधव बिनविरोध निवडुन आलेले ६ उमेदवार आणि २०० मतदारांचा महा रॅलीमध्ये सहभाग होता. फोंडाघाट बाजारपेठेत सर्व ठिकाणी सरपंच उमेदवार आणि सर्व महीलांनी औक्षण केले. अजित नाडकर्णी यांनी सर्व जागा निवडुन आणण्याचा आमदारांना दिलेला शब्द पुर्ण करणार. असा विश्वास नाडकर्णी यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा