You are currently viewing फोंडाघाट मधील विद्युत उपकरणे निकामी झालेल्या नुकसान भरपाई द्या

फोंडाघाट मधील विद्युत उपकरणे निकामी झालेल्या नुकसान भरपाई द्या

माजी सभापती सुजाता हळदीवे – राणे यांनी वेधले आमदार नितेश राणे यांचे लक्ष

आमदार नितेश राणे यांच्याकडून वीज अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना

कणकवली

फोंडाघाट येथील 11 केव्ही विद्युत वाहिनीचा इन्सुलेटर तुटल्याने हाय व्होल्टेजमुळे या भागातील काही नागरिकांची उपकरणे जाळल्या नंतर याबाबत तात्काळ संबंधित नुकसानग्रस्त नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी कणकवलीच्या माजी सभापती सुजाता हळदीवे – राणे यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली होती. आमदार नितेश राणे यांचे त्यांनी याबाबत लक्ष वेधले होते. व त्याची तात्काळ दखल घेत आमदार नितेश राणे यांनी याबाबत कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना सूचना दिल्या. त्यानुसार कार्यकारी अभियंता मोहिते यांच्याकडून या संदर्भात विद्युत उपकरणे हाय व्होल्टेज मुळे निकामी झालेल्या नुकसानग्रस्त नागरिकांच्या नुकसानीचे महसूल व वीज वितरण कडून पंचनामे करण्यात आले असून सुमारे साडेबारा लाख रुपयांचे यात नुकसान झाल्याची माहिती सुजाता हळदिवे – राणे यांनी दिली. या सर्वच नुकसानग्रस्त नागरिकांना महावितरण च्या माध्यमातून भरपाई मिळण्याची मागणी सुजाता हळदीवे – राणे यांनी केली आहे. आमदार नितेश राणे यांनी देखील याबाबत लवकरच बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या जातील असे आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या वीज समस्यांबाबत वारंवार लक्ष वेधून देखील त्याची योग्य कार्यवाही होत नसल्या चा मुद्दा देखील सुजाता हळदिवे यांनी उपस्थित केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + three =