You are currently viewing कणकवलीतील फुटपाथवरील बोर्ड हटवले; नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या सूचनेनंतर नगरपंचायत ची कारवाई

कणकवलीतील फुटपाथवरील बोर्ड हटवले; नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या सूचनेनंतर नगरपंचायत ची कारवाई

कणकवली

कणकवली शहरातील फूटपाथ वर लावण्यात आलेले दुकानांचे बोर्ड हटविण्याबाबत नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत श्री नलावडे यांनी तात्काळ हे बॅनर, बोर्ड हटविण्यात संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नगरपंचायत चे स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत व नगरपंचायत पथकाने आज कणकवली नरडवे चौक ते बस स्थानकापर्यंतच्या भागातील फुटपाथवर लावलेले बोर्ड हटवले. ही कारवाई सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असून हे बोर्ड पुन्हा लावले गेल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा स्वच्छता निरीक्षक श्री सावंत यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 3 =