You are currently viewing मालवण शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश

मालवण शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश

मालवण :

 

सिंधुदुर्गात शिवसेनेला शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. खा. विनायक राऊत आणि शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांचे खास मर्जीतील सहकारी म्हणून ओळख असलेल्या उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. श्री. शिंदे यांनी स्वतः या प्रवेशाची माहिती दिली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. मालवण येथील राजा गावकर यांनीही यावेळी शिंदे गटात प्रवेश केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे गटाचे समर्थन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा ओघ वाढत आहे. खा. विनायक राऊत आणि शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर यांचे खंदे समर्थक असलेल्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाल्याची माहिती स्वतः बबन शिंदे यांनी दिली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही शिवसेना शिंदे गटाचे समर्थन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याचे स्वागत केले. यामध्ये उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांच्यासह राजा गावकर, यांनीही प्रवेश केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा