You are currently viewing खासदार डॉ. अनिल बोंडे स्पर्धा परीक्षेला वाहिलेले व्यक्तिमत्व.

खासदार डॉ. अनिल बोंडे स्पर्धा परीक्षेला वाहिलेले व्यक्तिमत्व.

*आज ३ ऑगस्ट वाढदिवसाच्या निमित्ताने…*
=============
*खासदार डॉ. अनिल बोंडे स्पर्धा परीक्षेला वाहिलेले व्यक्तिमत्व…*
==============
आज अमरावतीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात गाजत आहे . दोन वर्षापूर्वीची आयएएस टॉपर कु सृष्टी देशमुख. उपजिल्हाधिकारी टॉपर कु पर्वणी रवींद्र पाटील. तहसीलदार टॉपर कु रूपाली मोगरकर. लिपिक टॉपर कु प्राजक्ता चौधरी व कर सहाय्यक टॉपर मोहम्मद शाहीद ही मुले संपूर्ण महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेले आहेत . आपल्यासाठी ही बाब अतिशय प्रेरणादायी आहे .अमरावती जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षेचे वातावरण तयार करण्यामध्ये माजी कृषी मंत्री व विदयमान खासदार डॉ. अनिल बोंडे यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये टॉपरमध्ये आलेल्या कु. प्राजक्ता चौधरी व रूपाली मोगरकर या दोन्ही मुली खासदार डॉ. अनिल बोन्डे साहेबांच्या मतदारसंघातील आहेत. डॉ.अनिल बोंडे यांनी स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत आपल्या मतदारसंघात जनजागृती केली ती नोंदणीयआहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदारसंघाचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. स्पर्धा परीक्षा कार्यशाळा. आईएएस टॉपर विद्यार्थ्यांचा सत्कार. करियर व्याख्यानमाला. स्पर्धा परीक्षा केंद्र .सामान्य ज्ञान परीक्षा .जूनियर आयएएस कॉम्पिटिशन हे उपक्रम आपल्या मोर्शी मतदारसंघात प्रचंड प्रमाणात राबवून खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी हा तालुका स्पर्धा परीक्षामय करून टाकला आहे. एमडी झालेल्या या डॉक्टर लोकप्रतिनिधीचे कार्य पाहून महाराष्ट्रातील प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपापल्या मतदारसंघात हे स्पर्धा परीक्षेचे उपक्रम राबविले तर महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत प्रचंड जनजागृती होईल व आयएएसच्या परीक्षेत महाराष्ट्राची टक्केवारी पण वाढेल. स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत आपल्या मतदारसंघातील युवकांना जागे करण्यासाठी त्यांनी आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व त्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या उपक्रमाला प्रारंभ केला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना निमंत्रित करुन त्यांनी त्यांचे जाहीर सत्काराचे व मार्गदर्शनाचे कार्यक्रम वरुड .मोर्शी. शेंदुर्जना घाट व जरूड येथे आयोजित केले . आयएएस टाँपर असलेले डॉ विपिन इटनकर .मुलीमधून पहिली आलेली कु शिप्रा आगरे. यांना बोलावून व त्यांचे ठिक ठिकाणी मार्गदर्शन उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांमध्ये व्यापक वातावरण निर्मिती केली आहे .प्रत्यक्ष टाँपर विद्यार्थ्यांच्या तोंडून त्यांची यशोगाथा ऐकावयाला मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमधील उत्साह वाढला आहे. ,, जूनियर आयएएस परीक्षा आपल्या मतदारसंघातील शाळांमध्ये राबवून स्पर्धा परीक्षा विषयक एखाद्या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी बसतात ही किमया खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी करून दाखविली आहे .शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षांची तयारी ही माझी कल्पना त्यांनी उचलून धरली व जूनियर आयएएस कॉम्पिटिशन व एकलव्य सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा या उपक्रमाच्या पाठीशी ते समर्थपणे उभे राहिले .या दोन्ही उपक्रमांना त्यांनी भरीव आर्थिक मदतही केली. विद्यार्थ्यांच्या शालेय पातळीवरील पाच सहा सात आठ नऊ-दहा या वर्गातील विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या. त्यांना पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात आली .कॉम्पिटिशनची पुस्तके घराघरात पोहोचली व मतदारसंघातील विद्यार्थी शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेकडे वळले आहेत. मतदार संघातील बहुतांश शाळा या उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या आहेत. स्पर्धा परीक्षांची माहिती मोर्शी वरुड तालुक्‍यातील प्रत्येक शाळेत प्रत्येक गावात जातील यासाठी त्यांनी वेळोवेळी गटशिक्षणाधिकारी मार्फत मुख्याध्यापकांच्या शिक्षकांच्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतल्या आहेत .त्यांना योग्य मार्गदर्शन यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचे महत्त्व पटवून सांगितले .तसेच शाळा-महाविद्यालयात जाऊन स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेण्यासाठी मार्गदर्शकांना वाहन व इतर व्यवस्था उपलब्ध करून दिली. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदार संघात जेवढ्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळा झाल्या तेवढ्या कार्यशाळा महाराष्ट्रात कोणत्याही तालुक्यात झालेल्या नाहीत. स्पर्धा परीक्षेची ए बी सी डी. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आवश्यक असते ते वर्तमान पत्राचे वाचन. या वर्तमानपत्रांचे वाचन करून त्यातून रोज 30 प्रश्न सोडविण्यासाठी स्पर्धा परीक्षेची एबीसीडी हे पुस्तक तयार केले आहे. खासदार डॉ. अनिल बोंडे साहेबांनी या पुस्तकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते घडवून आणले व त्या पुस्तकाच्या हजारो प्रती आपल्या मतदारसंघात विद्यार्थ्यांना विनामूल्य वितरित केल्या .या शिवाय सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी व सुप्रसिद्ध वक्ते श्री भारत आंधळे यांच्या गरुडझेप या पुस्तकाच्या एक हजार प्रती विद्यार्थ्यांना वाटल्या. याशिवाय प्रत्येक शाळेला आणि वाचनालयाला प्रत्येकी दहा हजार रुपयांची स्पर्धा परीक्षांची पुस्तके सप्रेम भेट दिली. या पुस्तकांचा उपयोग त्याच्या शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करीत आहे . शासकीय आयएएस केंद्र, डॉ.अनिल बोंडे यांनी आमदार असताना अमरावतीसाठी आयएएस केंद्र खेचून आणले आहे .
आज महाराष्ट्रमध्ये मुंबई, ठाणे,पुणे कोल्हापूर,औरंगाबाद नाशिक आणि नागपूर या ठिकाणी शासकीय आयएएस केंद्रे होती. अमरावतीला आय ए एस शासकीय केंद्र व्हावे या साठी खासदार डाँ.अनिल बोंडे तसेच डॉ. सुनील देशमुख यांनी पुढाकार घेतला आणि अमरावतीच्या शासकीय विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरामध्ये शासकीय आयएएस केंद्र प्रारंभ केले . या केंद्रांमध्ये आयएएस होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची तसेच वस्तीगृहाची सोय करण्यात आली आहे. डॉ. अनिल बोंडे यांनी हे शासकीय आयएएस केंद्र अमरावतीला आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.या कामी त्यांना मा. डॉ. सुनील देशमुखसाहेब यांचे सहकार्य देखील लाभले आहे. युवकांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी म्हणून डॉ. अनिल बोंडे यांनी दरवर्षी १८, १९ व २० जानेवारीला करियर युवा महोत्सव घेण्याची प्रथा पडली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शीच्या शिवाजी हायस्कूलच्या पटांगणावर हे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात .या करियर महोत्सवात विभागीय आयुक्त. जिल्हाधिकारी. पोलीस आयुक्त .पोलीस अधीक्षक .उपजिल्हाधिकारी तसेच करिअरच्या क्षेत्रातील नामवंत वक्ते यांना वेळोवेळी बोलावून डॉ. अनिल बोंडे यांनी मतदारसंघातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले आहे. आपल्या मतदार संघातील मुले अधिकारी झाली पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी स्पर्धा परीक्षेला पोषक असे वातावरण आपल्या मतदारसंघात केले आहे व करीत आहेत. या स्पर्धा परीक्षेसाठी झटणाऱ्या डॉ.अनिल बोंडे यांना आजच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
=====-=======
*प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आय* ए एस अमरावती 98 90 96 7003

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =