You are currently viewing जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी केंद्रस्तरावर प्रयत्न…

जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी केंद्रस्तरावर प्रयत्न…

प्रसारभारतीचा चमू जिल्ह्यात येणार

सावंतवाडी:
केद्रस्तरावर कोकणातील पर्यटनसाठी विशेष प्रयत्न केले जात असून जिल्ह्यातील परंपरागत कला, संस्कृती याचा ग्लोबल प्रचार व प्रसार व्हावा यासाठी प्रसारभारतीचा चमु १९ व २० सप्टेंबर रोजी जिल्ह्यात येवून अशा परंपरागत कला जोपसणारे कारागीर, व्यवसायिक यांच्यावर डाॅक्युमेंटरी तयार करण्यात येणार आहे. तसेच विविध पर्यटन स्थळांचेही चिञीकरण करण्यात येणार असून देशातील व परदेशातील पर्यटकाना *चला पर्यटनाला* या टायटल खालीही दुसरी डाॅक्युमेंटरी तयार करण्यात येणार आहे. याची सुरुवात सावंतवाडीपासून होणार आहे. निर्माता राजेश दळवी, कॅमेरामन आश्लेषा रायचौधुरी, साऊंड इंजिनिअर सुनित आरेकर आणि निवेदक श्रीराम केळकर हा प्रसारभारतीचा चमू सलग दोन दिवस चिञीकरण करणार असल्याची माहिती याचे समन्वयक व पर्यटन व्यवसायिक महासंघाचे जिल्हा कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर यांनी दिली.
सदर डॉक्युमेंटरीचे प्रकाशन रविवारी ९ आॅक्टोबर रोजी वेंगुर्ला येथे कालेलकर नाट्यगृहात एका शानदार समारंभात माजी केंद्रीय मंञी सुरेश प्रभू यांच्या शुभहस्ते होणार असून यावेळी नीरज अग्रवाल, अतिरिक्त महानिदेशक, प्रसारभारती, पश्चिम भारत व अन्य महनीय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
परंपरागत कला जोपासणाऱ्या कारागीरांना व पर्यटन व्यवसायिकानां या चिञीकरणात प्राधान्य दिले जाणार असून लाकडी खेळणी तयार करणारे कारागीर यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन कोकणच्या सर्वागीण विकासासाठी धडपड करणारे कोकणचे सुपूञ डॉ. अमेय देसाई,पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, उपाध्यक्ष डि. के. सावंत, कार्यवाह . नकुल पार्सेकर व सावंतवाडी तालुकाध्यक्ष जितेंद्र पंडित यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 15 =