दीपक केसरकरच राणेंना रोखू शकले होते.

दीपक केसरकरच राणेंना रोखू शकले होते.

राणेंच्या दिमाखदार एन्ट्री नंतर शिवसेनेचे जिल्ह्यातील अस्तित्व काय?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना म्हणजे राणे अशी परिस्थिती एकवेळ होती. परंतु राणे कॉंग्रेसवासी झाल्यानंतर शिवसेना औषधालाही शिल्लक ठेवणार नाही असे म्हणत राणेंनी जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व निर्माण केले. कट्टर शिवसैनिक असलेले परशुराम उपरकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवली. परंतु राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतर काँग्रेसचे निष्ठावंत वैभव नाईक यांनी शिवसेना प्रवेश करत जिल्हाध्यक्ष पदी विराजमान होत जिल्ह्यात शिवसेना वाढविली.
राणेंना टक्कर देण्याची ताकद त्यावेळी शिवसेनेत नव्हती. परंतु राष्ट्रवादी मधून दीपक केसरकर शिवसेनेत आले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे बळ त्यांना मिळाले आणि राणेपर्व दहशतवाद या मुद्द्यावर केसरकारांनी संपवले आणि खऱ्या अर्थाने जिल्ह्यात शिवसेना फोफावली. शिवसेना वाढविण्याची आणि राणेंना संपाविण्याची खरी किमया केलेली ती दीपक केसरकर यांनीच, आणि तेच राणेंना राजकारणात धोबीपछाड देऊ शकले होते.
शिवसेनेने दीपक केसरकर यांना बॅक फुटवर आणत उदय सामंत यांना पुढे करून स्वतःच्या पायावर दगड मारून घेतल्याचे चिन्ह सिंधुदुर्गात दिसत असून राणेंचा भाजपा प्रवेश सेनेचा उतरता काळ आणि भाजपाच्या उदयासाठी कारणीभूत ठरत आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांची साथ मिळाल्याने राणे याचे भविष्य उज्वल दिसत आहे, परंतु ज्याप्रमाणे राणे काँग्रेसमध्ये गेल्यावर मूळ काँग्रेसवाले संपले तसेच राणेंच्या भाजपा प्रवेशानंतर मूळ भाजपावाले कुठे असणार?

क्रमशः

(उद्या वाचा राणेंचा भाजपा प्रवेश आणि शिवसेना मूळ भाजपा वासियांचे भविष्य.)

प्रतिक्रिया व्यक्त करा