You are currently viewing भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पदवीदान सोहळा उत्साहात…

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पदवीदान सोहळा उत्साहात…

_*भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पदवीदान सोहळा उत्साहात….*_

_*दुसरी व पाचवीच्या विद्यार्थ्यांचा गौरव; मान्यवरांची उपस्थिती….*_

सावंतवाडी

_यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरी तसेच पाचवीच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी शाळेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले.कर्नल रत्नेश सिन्हा, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई व उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक आदी मान्यवर उपस्थित होते._

_दोन्ही इयत्तांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यार्थी व पालकांनी मनोगत व्यक्त केले आणि आनंद व समाधान वाटल्याचे सांगितले. रत्नेश सिन्हा व अवंतिका नाईक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्ग उपस्थित होता. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नेहा म्हाडेश्वर यांनी केले._

प्रतिक्रिया व्यक्त करा