You are currently viewing वर्दीतील स्त्रीशक्ती- पोलीस नाईक विद्या कोळेकर

वर्दीतील स्त्रीशक्ती- पोलीस नाईक विद्या कोळेकर

 

*नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव*

कोरोनाच्या लढ्यात पोलीस दलातील स्त्रीशक्तीने कर्तव्यापलीकडे जाऊन सामाजिक जाणिवेतून उल्लेखनीय काम केले आहे.त्या  स्त्री शक्तीचा सन्मान व गौरव करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न ..

 

*शक्तीचे, बुद्धीचे, नीतीचे*

भक्ती-शक्ती व कृषी संस्कृतीचे प्रतीक असणारे नवरात्रीचे मंगल पर्व सुरु असताना महाराष्ट्र पोलीस दलातील स्त्रीशक्तीच्या कार्याचा यथोचित गौरव करणे गरजेचे वाटते.

 

*पोलीस नाईक विद्या कोळेकर*

सोलापूर ग्रामीण पोलीसदलाच्या पोलीस नाईक विद्या कोळेकर यांनी त्यांच्या पतीच्या मदतीने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थींना मैदान तयार करुन देण्यासाठी भरीव योगदान दिले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी कोळेकर यांनी केलेल्या या उल्लेखनीय कार्याचा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला अभिमान आहे, असे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + fifteen =