You are currently viewing कणकवली तालुका रोटरी क्लबच्या वतीने विद्यामंदिर हायस्कूल येथे सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन प्रदान

कणकवली तालुका रोटरी क्लबच्या वतीने विद्यामंदिर हायस्कूल येथे सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन प्रदान

कणकवली

कणकवली तालुका रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट रोटेरियन वर्षा बांदेकर यांच्या वतीने विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली येथे सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीन प्रदान कार्यक्रम गुरुवारी पार पडला. पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात असा अनोखा उपक्रम घेण्यात आला आहे.
या प्रसंगी कणकवली रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट वर्षा बांदेकर, सेक्रेटरी उमा परब, ट्रेझरर माधवी मुरकर, असिस्टंट गव्हर्नर दिपक बेलवलकर, रो. दादा कुडतरकर, रो. रविंद्र मुसळे, रो. महेंद्र मुरकर, रो. अनिल कर्पे, रो. लवु पिळणकर, रो. मेघा गांगण, रो. प्रमोद लिमये, रो. विरेंद्र नाचणे, रो. नितीन बांदेकर, रो भेराराम राठोड. विधामंदिर प्रशाळेचे मुख्याध्यापक सरोदे आदी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट रोटेरियन वर्षा बांदेकर म्हणाल्या कि, मासिक पाळी हि महिलेच्या जीवनातील नैसर्गिक आणि महत्पूर्ण घटना असून या बाबत समाजाचे प्रबोधन होण्याची गरज आहे. आजही मुलींना आणि महिलांना मासिक पाळीमुळे समाजात अत्यंत दुय्यम वागणूक दिली जाते, हे वास्तव बदलले पाहिजे असेही वर्षा बांदेकर यावेळी म्हणाल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 10 =