पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची होडावडा गावाला भेट..

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची होडावडा गावाला भेट..

वेंगुर्ला :

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी काल ९ जून रोजी रात्री वेंगुर्ल्यात होडावडा येथे भेट दिली. यावेळी कोरोना रुग्ण संख्या जास्त असलेल्या दळवीवाडी व कोरोना विलगिकरण कक्षाची पहाणी करून त्यांनी स्थानिक प्रशासनाला कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सूचना व मार्गदर्शन केले.

होडावडा गावात कोरोना रुग्ण संख्या जास्त असल्याने गावच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान स्थानिक प्रशासनाच्या वतीने या अगोदरच येथील बाजारपेठ ८ दिवस बंद ठेवण्यात आली आहे. तसेच येथील ग्रामपंचायत, ग्राम कृती समिती व ग्रामस्थ यांच्या मदतीने याठिकाणी सुसज्ज असे कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहे. दरम्यान या संपूर्ण परिस्थितीचा जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी आढावा घेतला.

उपस्थित आरोग्य विभाग, ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाला मार्गदर्शन व आवश्यकत्या सूचनाही त्यांनी वकेल्या. यावेळी सरपंच अदिती नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, सर्कल श्री जाधव, ग्रा प सदस्य अनन्या धावडे, कृती समिती सदस्य राजबा सावंत, तलाठी श्रीमती मोरे, वैद्यकीय अधिकारी श्री जुन्नरे, सामाजिक कार्यकर्ते अरविंद नाईक, रवींद्र केळुसकर, श्रीकृष्ण कोंडुस्कर, भाऊ दळवी यांच्यासाहित वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा