अंमली पदार्थाच्या विरोधात जनजागृती साठी कुडाळात पोलिसांची रॅली…
कुडाळ
अंमली पदार्थाच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी आज कुडाळ पोलिसांच्या माध्यमातून शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी पोलीस ठाणे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशी ही रॅली फिरवण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासह पोलिस ठाण्याचे ४ अधिकारी, २७ अंमलदार, पोलीस पाटील, विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये अंमली पदार्थ विरोधी घोषणा देण्यात आल्या तसेच सर्वांना शपथ देण्यात आली.