You are currently viewing .. बोल्ड आणि कल्चर्ड….
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

.. बोल्ड आणि कल्चर्ड….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका अभिनेत्री सोनल गोडबोले लिखित अप्रतिम लेख*

*…. बोल्ड आणि कल्चर्ड…..*

या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीमधे असणं गरजेचं आहे तितकच ते अवघडही आहे.. कारण बोल्ड म्हणजे नक्की काय?? वेस्टर्न कपडे घालणं का ?? .. की जास्तीत जास्त एक्स्पोज करणं .. वेस्टर्न कपद्यासोबत तुमचे विचार बोल्ड आणि ठाम असणं.. आपल्याला जे म्हणायचचय ते न घाबरता मांडता येणं.. घातलेले कपडे उत्तमपणे कॅरी करता येणं .. आपल्याला काय सुट होतं आणि त्यासाठी कसं फिजीक असावं .. व्यायामाने आणि विचाराने तुम्ही किती सुडौल आहात यावर तुमचा बोल्डनेस ठरतो.. फक्त डोक्यावर भरपुर केस आहेत आणि डोक्यात काही नाही याचा उपयोग नाही तसच बोल्ड पेहराव आणि विचारसरणी बुरसटलेली तर त्याचा काहीच उपयोग नाही.. बोल्ड असताना कल्चर्ड असणं हे तर फार कमी जणांकडे असतं उत्तम विचाराने माणुस कल्चर्ड बनतो… पण आपल्याकडे पेहरावावरुन माणसाला जज केलं जातं आणि बऱ्याचदा फसगद होते ..बोल्ड या शब्दाची प्रत्येकाची वेगळी व्याख्या आहे..पण दोन्ही ज्याने सांभाळायचा प्रयत्न केला ती व्यक्ती बऱ्याचदा प्रिय असते.. बियॉन्ड सेक्स या माझ्या कादंबरीच्या नावावरुन ती बोल्ड वाटली आणि विषयावरुन ती कल्चर्ड वाटली.. राधा कृष्ण हेही याचं उत्तम उदाहरण आहे.. राधा पूर्ण कपड्यात होती पण तिचं कृष्णावरचं प्रेम हा तिचा बोल्डनेस कारण तो मॅरीड होता आणि एकमेकांना स्पर्श न करता प्रेम करणं हे कल्चर्ड होतं.. अतिशय उत्तम असं हे कॉंबीनेशन आहे.. तुम्ही कोणी सिमा आनंद ला फॉलो करत असाल तर त्या सेक्सवर बोलतात पण त्या कल्चर्ड आहेत हे त्यांच्या वागण्यातुन कळतं.. बोल्ड विषय तितक्याच ताकदीने मांडायला शोभा डे सारखं धाडस लागतं आणि आध्यात्मिक अनुषंगाने त्यावर चर्चा करायला कल्चर्ड असायला हिम्मत लागते.. अशी अनेक उदाहरणे आपल्याला घडवतात आणि वेगळ्या ॲंगलने जगण्याकडे पाहायला शिकवतात…

सोनल गोडबोले
लेखिका, अभिनेत्री,

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 16 =