You are currently viewing कुडाळात जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे २१ सप्टेंबर रोजी आयोजन

कुडाळात जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे २१ सप्टेंबर रोजी आयोजन

कुडाळ :

 

कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने बॅ. नाथ पै जन्मशताब्दी अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २१ सप्टेंबर कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्था येथे सकाळी १० वाजता होणार आहे. खुल्या गटासाठी व महाविद्यालयीन साठी ही स्पर्धा आहे. तसेच २४ सप्टेंबर रोजी बॅरिस्टर नाथ पै यांची जन्मशताब्दी अभिवादन सभा होणार आहेत. त्या निमित्ताने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

वकृत्व स्पर्धेसाठी विषय १८ वर्षा वरील खुल्या गटासाठी “बॅरिस्टर नाथ पै युग नायक” सात मिनिटे आहे. प्रथम पारितोषिक १५००/- व स्मृती चषक द्वितीय १२००/- स्मृती चषक तृतीय १०००/- व स्मृती चषक तसेच दोन उत्तेजनात ५००/- व चषक या स्पर्धेसाठी २० सप्टेंबर पर्यंत आपली नावे वृंदा कांबळी ९४२१२६२०३० वर नोंदवावी. तर निबंध स्पर्धेसाठी खुला गट असून स्व अक्षरात निबंध फुलस्केप वर १००० शब्द मर्यादित विषय “कोकणच्या विकासात बॅ नाथ पै यांचे योगदान” २० सप्टेंबर पर्यंत रामचंद्र कुबल ९४२०२१०८११ व गुरुनाथ ताम्हणकर मालवण बागायत यांच्याकडे पाठवावीत. प्रथम पारितोषिक १५००/-, १२००/-,१०००/- व स्मृती चषक प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे व दोन उत्तेजनार्थ ५००/- रुपये व स्मृती चषक प्रायोजक बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर दोन्ही स्पर्धांचे बक्षीस वितरण २४ सप्टेंबरच्या कार्यक्रमात कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे जन्मशताब्दी अभिवादन कार्यक्रमाच्या वेळी होणार आहे. तर या स्पर्धेत सर्व महाविद्यालयीन व खुल्या गटातील व्यक्तींनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के व सचिव विठ्ठल कदम व कार्याध्यक्ष भरत गावडे आदि जिल्हा कार्यकारणी सदस्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा