You are currently viewing सैनिक स्कूल आंबोली येथे कारगिल शहिदांना श्रद्धांजली

सैनिक स्कूल आंबोली येथे कारगिल शहिदांना श्रद्धांजली

आंबोली

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली आणि इंडियन एक्स सर्व्हिसेस लिग डिस्ट्रिक्ट सेंटर सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सैनिक स्कूल आंबोली येथे कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

सैनिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी कारगिल युद्धातील शुर सैनिक व वीरगती प्राप्त शहिदांना विविध युद्धचित्रे, चित्रकला, युद्धकथा याद्वारे सलामी देण्यात आली आहे. यावेळी कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी “संघर्षा के मैदान से विजयपथ की और…” या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा