You are currently viewing गणेशोत्सव कालचा आजचा आणि उद्याचा
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

गणेशोत्सव कालचा आजचा आणि उद्याचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ उल्का कुलकर्णी लिखीत अप्रतिम लेख*

*गणेशोत्सव कालचा आजचा आणि उद्याचा*

  1. ” श्री गणराया आधी वंदू तुज मोरया “

विघ्नहर्त्या गणेशाचे आगमन नेहमीच वंदनीय आदरणीय आणि उत्साहाचं असं असतं. आधीही ते तसंच होतं आणि पुढेही ते तसंच राहील. कालमानाप्रमाणे थोडेसे बदल होतात. गणेश स्थापना दिवस ते अनंतचतुर्दशी हे दहा दिवस, कसे भुर्रकन उडून जातात. एक वेगळेच चैतन्य उत्साह, सर्व घराघरातून बाजारपेठेतून जाणवतो. त्याच दहा दिवसात गौरींचे आगमन होते. चारही बाजूने हा सण मोठा समजला जातो. त्यामुळे रोजच्या कामात अजूनच भर पडते. रोज आरती ,महाप्रसाद, त्यानिमित्ताने एकमेकांच्या घरी जाणे, घराची एक विशिष्ट जागा, त्याच्या वास्तव्याने व्यापलेली, आधीची तयारी, हे सगळं कसं उत्साहवर्धक असतं ‌. चैतन्य ओसंडून वाहत असतं. ठिकाणची सार्वजनिक मंडळी त्यात अजून भर घालतात. तरीपण या उत्सवाचे कालमानाप्रमाणे बदललेले रूप, नक्कीच आपल्या पिढ्यांना जाणवते.

गणेशोत्सव कालचा__
साधारण एक 50 ते 60 वर्षांपूर्वीचा काळ पाहिला तर, गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा होत असे. सजावट ,डेकोरेशन या गोष्टीला फारसे महत्त्व नव्हते.धार्मिकता ,श्रद्धा, सात्विकता या गोष्टीला जास्त महत्व होते. अगदी शास्त्रानुसार ,विधीनुसार सर्व गोष्टी होत असत. कुलपरंपरेने जसे चालत आले तसेच पुढेही चालू ठेवण्याची प्रथा होती. मूर्ती आणतानाचे सुद्धा विशिष्ट असे नियम असायचे. शाडूचीच मूर्ती आणली जायची. प्रतिष्ठापनेसाठी तीच योग्य समजली जायची.सार्वजनिक मंडळेही ठराविकच असायची. तेथील माइक वरचा आवाजही, सार्वजनिक शांतता भंग होणार नाही असाच असायचा. मंडळातील वातावरण अतिशय सुंदर असायचे. विसर्जनही अगदी परंपरेप्रमाणेच असायचे.माझ्या माहेरी तर अजूनही, आमचे कुल परंपरेने चालत आलेले गुरुजी, यांच्याकडूनच सोवळ्यात गणपतीची प्रतिष्ठापना होते. अनंत चतुर्दशीला अनंताची पूजा असते. अनंत म्हणजे दर्भाचा नाग. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे व्रत चालत राहते.
आणि त्या दहा दिवसातील मंडळातील गणपतीचे देखावे अतिशय साधे असायचे. हलते किंवा आकर्षक देखावे नसायचे. डीजे सारखा धांगड धिंगा नसायचा.
त्यावेळेसची विसर्जन मिरवणूकही अगदी शिस्तबद्ध व शांततेत असायची. शाळेच्या मुली त्यामध्ये टिपऱ्या, लेझीम यांची प्रात्यक्षिके करत असत. मुलींच्या अंगावर कधीही गुलाल उधळला जात नसे. अगदी योग्य वेळेतच सर्व गणपतींचे विसर्जन होत असे.

गणेशोत्सव आजचा___
आजची गणेशोत्सवाचे स्वरूप तर निश्चितच बदललेले आहे. प्रत्येक गोष्टीचे बाजारीकरण झाले आहे. श्रद्धा , सात्विकता ,धार्मिकतेपेक्षा आभासी थाटाला जास्त महत्त्व आलंय. आजच्या पिढीला सोवळं हा प्रकारच माहीत नाही.शास्त्र ,परंपरा अगदी मोडीत निघत आहे. ज्याच्या मनात येईल तो गणपती बसवत आहे. पाच दिवसांचा गणपती दहा दिवसांचा होतोय, आणि दहा दिवसांचा गणपती पाच दिवसांचा. मुलांना आवडेल ती गणेश मूर्ती आणली जाते आणि आज शाडूच्या मूर्तीला तर आज अनन्यसाधारण असे महत्त्व आले आहे धार्मिकतेच्या ,प्रदूषणाच्या आणि किंमतीच्या दृष्टीने ही.सार्वजनिक मंडळे गल्लोगल्ली उभारले जातात. मोठ्यांदा गाणी वाजवून सार्वजनिक शांतता धोक्यात आणली जाते. घराघरातून श्रीमंतीचे सर्रास प्रदर्शन केले जाते. गणपतीला पूर्ण चांदीचा साज असतो. चांदीच्या दुर्वा, जास्वंदीचे फूल , पानसुपारी मुकुट वगैरे वगैरे. या कृत्रिम गोष्टीतून खरी सात्विकता थोडीच जपली जाणार आहे? सोशल मीडिया ऍक्टिव्ह असल्यामुळे, घर बसल्या ऑनलाईन पुजा सांगितली जाते आणि केली जाते. लोकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सार्वजनिक मंडळात स्पर्धा घेतल्या जातात. बक्षिसे दिली जातात. शाडूच्या मूर्तींची चे भाव प्रचंड जास्त असल्यामुळे, प्रत्येकालाच ती घेणे परवडत नाही. तुलनेने पीओपीच्या मूर्तीची किंमत कमी असल्यामुळे, परंतु प्रदूषणाचे संकट वाचवण्यासाठी ठिक ठिकाणी विसर्जनाच्या वेळी कृत्रिम तलाव उभे केले जातात. मुर्त्या दानही केल्या जातात. नद्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी, निर्माल्य याचीही वेगळी व्यवस्था केली जाते

विसर्जन मिरवणुकीचा थाट तर काही औरच असतो. डिजे ,साऊंड सिस्टिम याशिवाय तर मिरवणूक संभवतच नाही.प्रत्येक मंडळाचे एक वेगळे वैशिष्ट्य असते. ढोल पथके तर सध्याच्या मिरवणुकीचा ट्रेंड आहे. मुलांप्रमाणेच मोठ-मोठे ढोल गळ्यात अडकवून विशिष्ट तालावर ,मिरवणुकीतील किती तरी आंतर, चालताना मुलीही थकत नाहीत हे विशेष आणि स्पर्धेचे युग असल्यामुळे वेगवेगळे ढोल पथके आपले वेगवेगळे सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतात. अगदी दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत विसर्जन सुरूच असते.

गणेशोत्सव उद्याचा __
उद्याच्या गणेशोत्सवाचे स्वरूप ही थोड्याफार फरकाने असेच असेल. स्वतःची आवड आणि सवड जपली जाईल. सध्या प्रत्येक ठिकाणी ऑनलाइन हा ट्रेंड मूळ धरत आहे तोच पुढे फोफावताना दिसेल. सोशल मीडिया म्हणजे आधुनिक काळातले गुरूच. चांगल्या दृष्टिकोनातून विचार केला तर कलियुगात धार्मिकतेचे महत्त्व वाढताना दिसते. थोडा फार आधुनिक काळातला बदल बाजूला ठेवला तर, तेवढ्याच जल्लोषात ,आनंदात गणेशाचे आगमन नवीन पिढीही करणार यात शंकाच नाही.

कोरोना पूर्वीचा गणेशोत्सव __अगदी टेंशन विरहित धुमधडाक्यात साजरा होत होता. मोकळेपणाने सर्वजण एकत्र येत होते. एकमेकांच्या घरी जाणे होत होते. कसलेही बंधन नव्हते.
कोरोना काळातला गणेशोत्सव__ एकत्र येण्याला निर्बंध आले खर्चाच्या दृष्टीने काटकसर होऊ लागली अगदी थोडक्यात सण साजरा होऊ लागला. चैतन्य उत्साह कमी झाला.
उद्याचा म्हणजेच कोरोना संपल्यानंतर चा गणेशोत्सव__
तोच उत्साह चैतन्य जाणवेल. सगळी मरगळ नाहीशी होईल.
“गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया”

सौ उल्का कुलकर्णी ✍️ नाशिक

Advertisement

*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*

*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*

*_👨‍👩‍👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*

*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*

*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*

*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*

*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*

*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*

*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*

*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*

*🏃🏻‍♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*

*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*

*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*

*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*

*सविस्तर वाचा …👇*
https://sanwadmedia.com/54342

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =