You are currently viewing ‘कर्तव्य’ दक्ष अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जोपासली आपली आवड..

‘कर्तव्य’ दक्ष अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जोपासली आपली आवड..

बाप्पाच्या मिरवणुकी दरम्यान पोलीस बंदोबस्ताची पाहणी करताना सिंधुगर्जना ढोल पथकात सामील होत स्वतः ढोल वाजवीला..

 

कणकवली :

 

कणकवली येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी  सहभागी होऊन ढोल पथकात सामील होत स्वतः ढोल वाजवीला. ढोल वाजवण्याचे आवड असलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना कणकवली ढोल पथकास समवेत सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीत ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत ढोल पथकाचे नेतृत्व करत ताला सुरात ढोल वाद्याचे प्रदर्शन केले.

कायदा व सुव्यवस्था बिघडून नये म्हणून नेहमीच ‘कर्तव्य’दक्ष बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सतर्क रहावे लागते. कर्तव्यदक्षतेमुळे त्यांना सण, उत्सव व
राजकीय पक्षांचे कार्यक्रमांच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी नेहमीच सज्ज रहावे लागते. परंतु सण व उत्सवांचा आनंद लुटण्याची इच्छा असतानाही सेवा बजावाली लागते. कणकवली शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान
असलेल्या पोलीस बंदोबस्ताची पाहणी करण्यासाठी आलेल्या अप्पर पोलीस अधीक्षकांनी चक्क कणकवली शहरात महापुरुष मित्रमंडळ मंडळाने काढलेल्या
गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोल वाजवून विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटला. यावेळी बगाटे यांनी कणकवलीतील सिंधुगर्जना ढोल पथकाचे कौतुक करत आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × one =