You are currently viewing अनंत पिळणकर यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी होणार आज साजरा

अनंत पिळणकर यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी होणार आज साजरा

अनंत पिळणकर यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी होणार साजरा

रक्तदान शिबिरासह ,रुग्णांना करण्यात येणार फळवाटप

कणकवली :

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार चे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा वाढदिवस आज 3 एप्रिल रोजी विविध सेवाभावी सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. अनंत पिळणकर हे गेली 20 वर्षाहून अधिक काळ सिंधुदुर्ग च्या राजकीय आणि सामाजिक पटलावर कार्यरत आहेत. रोखठोक स्वभावाचे पिळणकर हे राजकारणासोबतच आपली सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तीमत्व म्हणून सुपरिचित आहेत.

बुधवार 3 एप्रिल रोजी अनंत पिळणकर यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत अनंत पिळणकर यांच्या नवीन कुर्ली वसाहत येथील निवासस्थानी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे दुपारी रुग्णांना फळवाटप केले जाणार आहे.

रात्री 7 ते 10 वाजेपर्यंत अनंत पिळणकर यांच्या नवीन कुर्ली वसाहत येथील निवासस्थानी केक कापला जाणार असून तिथे शुभेच्छा स्वीकारण्याचा आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अनंत पिळणकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 7 =