You are currently viewing अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्सचे” माजगाव उद्यमनगर येथे उद्या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्सचे” माजगाव उद्यमनगर येथे उद्या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

“अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्सचे” माजगाव उद्यमनगर येथे उद्या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आयटी क्षेत्रातील कंपनीत अनेकांना नोकरीची संधी…*

*सावंतवाडी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच नोकरीचे नवीन दालन उभे राहात असून अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्सच्या माध्यमातून अनेकांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत. यासाठी माजगाव उद्यमनगर येथे नव्याने दालन उघडण्यात आले असून, दिवस रात्र शंभर युवक युवतींना रोजगाराची संधी मिळणार असल्याची माहिती गो सोर्स कंपनीचे सीईओ संतोष कानसे यांनी दिली. यावेळी संचालक अन्नपूर्णा कोरगावकर, ऐश्वर्या कोरगावकर ,श्रीरंग आचार्य, भिकाजी कानसे, अखिलेश कोरगावकर उपस्थित होते.

सिंधुदुर्गातील मुलांमध्ये मोठ्याप्रमाणात टॅलेंट आहे आणि त्याला वाव देण्यासाठी आयटी कंपनीच्या माध्यमातून पायलट प्रोजेक्ट आम्ही सुरू करीत आहे. भविष्यात १० हजार बेरोजगार युवक युवतींना रोजगार देण्यात येईल अशी माहिती कानसे यांनी दिली. मुंबई पुण्याच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आयटी क्षेत्रातील कंपनी सुरू करण्यात आली असून या स्टार्टअप कंपनीत सुरुवातीला सिंधुदुर्गातील २४ युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आला असून, लवकरच १०० जणांना रोजगार देण्याचा आमचा संकल्प आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक युवक युवती आयटी क्षेत्रात काम करण्यासाठी पुणे मुंबई व देश विदेशातील अन्य शहरांमध्ये जात असतात. अशा मुलांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. येथील मुलांमध्ये टॅलेंट ची कमतरता नाही मात्र त्यांच्या टॅलेंटला वाव देण्याची गरज आहे. याच हेतूने आम्ही या कंपनीत स्थानिकांनाच संधी देणार आहोत असे कानसे यांनी आवर्जून सांगितले.

पुणे मुंबईतील कंपनीच्या धर्तीवरच येथील मुलांनाही वेतन व अन्य सुविधा देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेसारख्या देशात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे, मात्र येथे युवकांची वानवा आहे. त्यामुळे अमेरिकेतील रियल इस्टेट हेल्थकेअर व मोर्गेज इंडस्ट्रीसाठी या आयटी कंपनीच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. यासाठी पुणे मुंबईतील प्रशिक्षक येथील मुलांना कोडींग , बिलिंग व अन्य बाबतचे प्रशिक्षण देण्यात येइल. दिवस व रात्री अशा दोन्ही सत्रात येथे काम चालणार असून येथे काम करणाऱ्या मुलांची व विशेष करून महिलांची योग्य ती काळजी व सुरक्षितता कंपनीकडून घेतली जाणार असल्याचेही कानसे यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − six =