You are currently viewing धामापूर कर्ली खाडी किनारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह

धामापूर कर्ली खाडी किनारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह

अधिक तपास सुरू असल्याची मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांची माहिती

मालवण :

 

मालवणातील धामापूर येथे कर्ली खाडी किनारी एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडून आला आहे. मालवण पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी शुक्रवारी दिली आहे.

पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. यावेळी मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मृतदेहाच्या अंगावर हिरव्या रंगाचा ब्लाउज, फिकट तांबड्या रंगाचा परकर, हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र व कानात पट्टीचे सोन्यासारख्या धातूचे कानातले आहेत. अशी माहिती मालवण पोलिसांनी दिली आहे. मृत महिला ५० ते ५५ वयोगटातील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी मालवण पोलीस अधिक तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 13 =