You are currently viewing श्री देव महापुरुष शिवमंदिर उत्तरवाडा तांबळडेग येथे रौप्यमहोत्सवी तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन

श्री देव महापुरुष शिवमंदिर उत्तरवाडा तांबळडेग येथे रौप्यमहोत्सवी तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) :

श्री देव महापुरुष शिवमंदिर उत्तरवाडा, तांबळडेग मंदिराला २५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून शुक्रवार दि. ८ ते १० मे या कालावधीत मंडळाच्यावतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दि.८ मे रोजी सकाळी ८.३० वा. शिवलिंगावर अभिषेक करून सोहळ्याला प्रारंभ करण्यात येणार असून गावचे रहिवाशी श्री. सुर्यकांत जुवाटकर यांनी आपली बहीण कै. कल्याणी जुवाटकर- ढोके यांच्या स्मरणार्थ नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या रंगमंचाचे लोकार्पण उद्घाटन व गणेश पूजन होऊन त्यानंतर होम हवन होऊन दुपारी ब्राम्हण भोजन व महाप्रसाद तर सायंकाळच्या सत्रात आरती, रात्रौ १० वा. ज्यांनी आजवर योगदान दिले त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असून त्यानंतर १०.३० ‘ माय मराठी ‘ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

शनिवार ९ मे रोजी सकाळी ९ वा. श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिर तांबळडेग ते श्री देव महापुरुष शिवमंदिर पर्यंत शोभायात्रा आयोजित करून त्यासाठी पुरूष आणि महिलांना विशेष दुपारी ३वा. हळदी कुंकू, होम मिनिस्टर व महिलांसाठी व लहान मुलांसाठी स्पर्धात्मक कार्यक्रम मंडळातर्फे व दर्यावर्दी हनुमान स्पोर्ट्स क्लबच्या वतीने विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. सायं – आरती होईल.

रविवार दि.१० मे रोजी सकाळी १० वा. श्री सत्यनारायण वार्षिक पूजेचे आयोजन करण्यात आले असून पूजेचे यजमान म्हणून सौ. सीमा सागर सनये या दांपत्याला मान देण्यात आला आहे. दुपारी महाआरती व भजन तद्वतच तिर्थप्रसाद व महाप्रसाद सायं ३ ते ५ यावेळेत जीवन विद्या मिशन सांप्रदाय सद्गुरू वामनराव पै अनुयायी हरिपाठ करून नामाचे महत्त्व अधोरेखित करतील.तद्वतच सायं ५ ते ७ या वेळेत स्थानिक बुवांची सुस्वर भजने सादर करून महापुरुषांच्या चरणी सेवा देतील. सायं ७ वा. आरती रात्रौ ठिक १० वा. दत्त अवधुत मुंबई निर्मित पुरस्कार विजेते अनंत थिएटर सविनय सादर ” विठ्ठल विठ्ठल”आहे दोन अंकी नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. त्यानंतर तीन दिवसीय कार्यक्रमाची सांगता होईल .तरी सर्व भाविक भक्तांनी रौप्यमहोत्सवी सोहळ्यात सहभागी होऊन तिर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्तरवाडा विकास मंडळ (रजि) तांबळडेग/ मुंबईस्थित संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा