You are currently viewing मठ येथे शॉर्टसर्किटमुळे रस्त्यावरच पेटली कार

मठ येथे शॉर्टसर्किटमुळे रस्त्यावरच पेटली कार

कारचे मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

वेंगुर्ले

वेंगुर्ले कुडाळ मार्गावरील मठ येथे वेंगुर्ले खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक संजीव चमणकर यांच्या कारला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून कारचे जळून खाक झाली. मात्र सुदैवाने जीवितहानी टळली.


खर्डेकर महाविद्यालयातील प्राध्यापक संजीव चमणकर महविद्यालय सुटल्यावर वेंगुर्ले येथून वेतोरेच्या दिशेने घरी जात होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी गाडीमध्ये प्रवास करत होती. कार एम एच 07 क्यू 0079 मठ टाकयेवाडी येथे आली असता त्या कारमधून धूर येण्यास सुरुवात झाली. तत्काळ चमणकर यांनी पत्नीसह बाहेर येऊन पाहिले असता धूर वाढला आणि गाडीने पेट घेतला. या दुर्घटनेबाबत तात्काळ स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळविले तसेच वेंगुर्ले नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाला पाचारण केले. बंब काही कालावधीत घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी आग विझवली, मात्र तोपर्यंत कार पूर्ण जळून नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी स्थानिकांनीही मदत कार्यात सहभाग घेतला. दरम्यान वेंगुर्ले कुडाळ मुख्य मार्गावर ही दुर्घटना घडल्याने काही काळ या भागातील वाहतूक ठप्प झाली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा