You are currently viewing मालवण बसस्थानक परिसरात सायबर जनजागृती अभियान

मालवण बसस्थानक परिसरात सायबर जनजागृती अभियान

पथनाट्याद्वारे सायबर क्राईम बाबत मार्गदर्शन ; उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक

मालवण

सिंधुदुर्ग पोलीस दलामार्फत पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या संकल्पनेतून मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने मालवण एस टी स्टँड परिसरात बुधवारी सायंकाळी सायबर क्राईम जनजागृती अभियान राबविण्यात आले.

सदर अभियानांतर्गत सायबर क्राईम विषयी घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत पोलीस अधिकारी व अंमलदार सहायक पोलीस निरीक्षक श्रीमती एस. एस. बंगडे, पोहेकॉ सुभाष शिवगण, महिला पोलीस हवालदार सुप्रिया पवार, महिला पोलीस नाईक वृषा पाटील, महिला पोलीस नमिता ओरोसकर यांनी सायबर फसवणुकीबाबत पथनाट्य सादर केले. या कार्यक्रम प्रसंगी सायबर मोबाईल व्हॅनद्वारे कार्यक्रमाची शोभा वाढविण्यात आली. यावेळी मालवण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन नरळे, स. पो. उपनिरीक्षक एस. पी. चव्हाण, एस.एस. आंबेरकर, गुरुप्रसाद परब, प्रतिक जाधव यांच्यासह ओरोस सायबर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या सायबर क्राईम जनजागृती अभियाना मुळे लोकांच्या ज्ञानात भर पडल्याने लोकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असून, पोलीस प्रशासनाची प्रतिमा उंचावण्यास मदत झालेली आहे. मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने अशा प्रकारचे जनजागृती पर कार्यक्रम आगामी काळातही राबवण्यात येणार आहेत

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =