You are currently viewing तळेरेतील दळवी महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सुयश

तळेरेतील दळवी महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सुयश

अनुष्का लोके हिची राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी निवड

तळेरे

तळेरे, येथील मुंबई विद्यापीठाचे घटक महाविद्यालय, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत घवघवीत यश संपादित केले आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमीत्त महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील बॅचलर ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स (बीबीआय) विभागातील तृतीय वर्षातील
विद्यार्थिनी कु.अनुष्का प्रकाश लोके हिने, तृतीय क्रमांक पटकावला असून तिची राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या यशामुळे दळवी महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या स्पर्धेत महाविद्यालयातील दहा विद्यार्थांनी सहभाग नोंदविला होता. त्यांना महाविद्यालयाचे सहा. प्राध्यापक तसेच एनएसएस चे कार्यक्रम अधिकारी नरेश शेट्ये यांचे मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक श्री.विनायक दळवी यांच्यासह समन्वयक, डॉ. एस.के पवार यांनी यशस्वी विद्यार्थीनीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

१.अनुष्का लोके

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 4 =