You are currently viewing हेलिकॉप्टर दुर्घटनेतून थोडक्यात बचावले……केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद!!!!

हेलिकॉप्टर दुर्घटनेतून थोडक्यात बचावले……केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद!!!!

 

नवी दिल्ली :

 

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद काल एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. सध्या बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. या दरम्यान पाटणा एअरपोर्टवर त्यांचे हेलिकॉप्टर तारेला धडकले. ज्यामुळे हेलिकॉप्टरचे ब्लेड तुटले. या दुर्घटनेच्यावेळी मंगल पांडेय आणि संजय झा त्यांच्यासोबत होते.

पाटणा एअरपोर्टजवळ बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी ओव्हरहेड वायरला हेलिकॉप्टरचे पंखा लागला.त्यामुळे हेलिकॉप्टरचे ब्लेड तुटले. या दुर्घटनेत रविशंकर प्रसाद सुदैवाने बचावले. त्यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. रविशंकर प्रसाद निवडणूक प्रचार संपवून पाटण्याला परतले होते.

हेलिकॉप्टरच्या लँडिंगच्यावेळी पंखा तारेला धडकला. हेलिकॉप्टरचे दोन ते तीन ब्लेड तुटले. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये रविशंकर प्रसाद, बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडेय आणि बिहारचे जलसिंचन मंत्री संजय झा उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − 5 =