You are currently viewing देवगड तालुक्यातील आदर्श शिक्षण समिती (रजि) संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवड

देवगड तालुक्यातील आदर्श शिक्षण समिती (रजि) संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवड

 

देवगड तालुक्यातील आदर्श शिक्षण समिती (रजि) संस्थेच्या कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी श्री.सुरेश पवार, उपाध्यक्षपदी श्री.अनंत दाभोळकर, सरचिटणीसपदी

श्री.भारत पाटणकर तर खजिनदारपदी श्री.राजाराम पवार निवड यांची वर्णी लागली आहे. सन २०२३-२४ व सन २०२४-२५ सालासाठी कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली आहे.

देवगड तालुक्यातील आदर्श शिक्षण समिती (रजि) या संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट १९६० रोजी करण्यात आली. सन २०२३ ते २०२४ व सन २०२४ ते २०२५ या कार्यकाळा करीता १५ पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. आदर्श शिक्षण समिती संस्थेचे मुख्य कार्यालय रूस्तम बिल्डिंग कंपाउंड, गणपतराव कदम मार्ग ,

लोअरपरेल मुंबई येथे असून संस्था शैक्षणिक दृष्ट्या आर्थिक मागास असलेल्या मुलांना आधार देते, मदतीचा हात देते. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रमांद्वारे मुलांना प्रोत्साहन देते, यथोचित सन्मान करून उज्वल भविष्य घडविण्यासाठी हातभार लावते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 20 =