You are currently viewing माय मराठी

माय मराठी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री उज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माय मराठी* 

 

जन्म कुसुमाग्रजांचा ,

सौभाग्य महाराष्ट्रा चे!

लाभे कृपा शारदेची ,

भाग्यवंत आम्ही येथे !

 

माय मराठी रुजली,

अमुच्या तनामनात!

दूध माय माऊलीचे,

प्राशिले कृतज्ञतेत !

 

साहित्य अंकी खेळले,

लेख, कथा अन् काव्य!

माऊलीने उजळले ,

ज्ञानदीप भव्य- दिव्य!

 

घेतली मशाल हाती ,

स्फुरे महाराष्ट्र गान !

भक्तीचे अन् शौर्याचे,

राखले जनी हे भान!

 

ज्ञानेश्वरी ज्ञानयाची,

सोपी भाषा तुकयाची!

मराठी रामदासांची ,

समृद्धी माय मराठीची!

 

सौंदर्यखनी मराठी,

कौतुक तिचे करू या!

मी महाराष्ट्रीय याचा,

अभिमान बाळगू या!

 

उज्वला सहस्रबुद्धे, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − eighteen =