You are currently viewing पर्यटन व्यवसायीकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पर्यटन व्यवसायीक महासंघाची वेंगुर्ले तालुक्यामध्ये बैठकीचे आयोजन

पर्यटन व्यवसायीकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पर्यटन व्यवसायीक महासंघाची वेंगुर्ले तालुक्यामध्ये बैठकीचे आयोजन

वेंगुर्ले

पर्यटन व्यवसायीक महासंघ , सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या व्यवसायीकांना संघटीत करून त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी संघटीत पणे प्रयत्न केले जात आहेत व्यापारी व पर्यटन क्षेत्रातील व्यवसायीकांना व्यवसायात येणाऱ्या शासकीय व अन्य अडचणी सोडविण्यासाठी पर्यटन महासंघ कार्य करीत असुन , वेंगुर्ले तालुक्यातील पर्यटन व्यवसायीकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी *पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णु उर्फ बाबा मोंडकर* यांच्या प्रमुख उपस्थितीत *रविवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ = ०० वाजता साईमंगल कार्यालय , सुंदरभाटले – वेंगुर्ले* येथे बैठकीचे आयोजन केले आहे .
तरी वेंगुर्ले तालुक्यातील निवास न्याहारी योजनेचे व्यावसायिक , हाॅटेल व्यवसायीक , जल क्रीडा व्यवसायीक , रिसाॅर्ट मालक , सहल आयोजक , ट्रॅव्हल एजंट , तंबु निवास व्यवसायीक , होम स्टे व्यवसायीक , अॅग्रोटुरीझम व्यवसायीक , गाईड इत्यादींनी या बैठकीस उपस्थित रहावे , असे आवाहन पर्यटन व्यवसायीक महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व महेश सामंत ( भोगवे ) यांनी केले आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा