You are currently viewing करूया पितृपक्ष नव्या पद्धतीने असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमाचे मदतीचे आवाहन

करूया पितृपक्ष नव्या पद्धतीने असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमाचे मदतीचे आवाहन

कणकवली

पितृ पंधरवड्यात आपल्या पितृजनांचे स्मरण आपण दिविजा वृध्दाश्रमातील गरजू आजी-आजोबांना एक दिवसीय अन्नदान करून आपल्या पित्रांचे स्मरण करुन आठवणींचा जागर करावा. इतर भरलेल्या पोटाला अन्नदान करण्यापेक्षा गरजवंताला अन्नदान करून पितृपक्ष नव्या पद्धतीने साजरा करून वेगळा पायंडा पाडावा, असे आवाहन असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमाकडून करण्यात आले आहे.

स्वस्तिक फाउंडेशन ही संस्था उपेक्षित गरीब, गरजू, अपंग लोकांकरिता कार्य करणारी कोकणातील अग्रेसर संस्था आहे. स्वस्तिक फाउंडेशन या संस्थेचा मुख्य उपक्रम असलदे येथील दिविजा वृध्दाश्रम असून त्यात 45 निराधार आजी-आजोबा उपचारात्मक पुनर्वसनाची सेवा घेत आहेत. सद्यस्थितीत दिविजा वृद्धाश्रमात 24 आजी व 21 आजोबा उपचारात्मक सेवा घेत आहेत. अशा या आजी-आजोबांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवीत आहे.

कौटुंबिक प्रवाहातून बाहेर पडलेल्या आजी-आजोबांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी संस्था आपले पारंपारिक धार्मिक सण मोठ्या उत्साहाने आणि पारंपारिक पद्धतीने साजरे करतात. त्यात प्रमुख सण म्हणजे चैत्रातील गुढीपाडवा, आषाढातील आषाढी एकादशी, श्रावणातील रक्षाबंधन, गोपाळकाला, भाद्रपदातील गणेशोत्सव, अश्विनातील नवरात्र, दिवाळी, तुलसीविवाह, मार्गशीर्षमधील सत्यनारायण पूजा, मकरसंक्रात, होळी इत्यादी सण आजी-आजोबा उत्साहपूर्ण वातावरणात आनंदाने साजरे केले जातात.

दिविजा वृद्धाश्रमात आजी-आजोबांसाठी अद्यावत ग्रंथालय, मनोरंजनाची साधने, कॅरम तसेच ऑनलाईन योग सेशन आयोजित केले जातात. सद्यस्थितीत आश्रमात जागेची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे नवीन अद्यावत वास्तू उभारण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. त्यामुळे आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींकडे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. सजग नागरिकांकडून येणाऱ्या मदतीतून आधुनिक स्वरूपाचा आश्रम उभारण्यात येणार आहेत.

दानशूर व्यक्तिंनी वृध्दाश्रमास सढळहस्ते मदत करून आश्रमाच्या पुर्नबांधणीसाठी हातभार लावावा, तसेच, आगामी येणार्या पितृ पंधरवडा आपण वेहळ्या पध्दतीने साजरा करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. आपण आपल्या प्रियजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ, अन्नदानाच्या स्वरुपात किंवा आर्थिक मदत देऊन आश्रमास मदत करू शकता.

मदतीसाठी संदेश शेट्ये : 9223221400 , दीपिका रांबाडे : 8530700102 अविनाश फाटक 9820218269
अस्मि राणे8080071626 यांच्याही संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 8 =