You are currently viewing अनंत पिळणकर यांच्याकडून वैभव मालंडकर यांचे अभिनंदन

अनंत पिळणकर यांच्याकडून वैभव मालंडकर यांचे अभिनंदन

कणकवली

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी कणकवली शहर शिवसेना उपशहर प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल वैभव मालंडकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देखील दिले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर हे देखील उपस्थित होते.

कणकवली शहर शिवसेना उपशहर प्रमुख पदी वैभव मालंडकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या फोंडा नवीन कुर्ली येथील निवासस्थानी वैभव मालंडकर यांचे अनंत पिळणकर यांनी अभिनंदन केले तसेच त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष अविनाश चव्हाण, सखाराम हुंबे, संतोष चव्हाण, उत्तम तेली, बाळा मसुरकर, सुजल शेलार, वैभव मलांडकर राजू मेस्त्री, शुभम सुतार, महेश पाटील तुषार पिळणकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा