You are currently viewing नितेश राणे यांनी मूळ गावी वरवडेत केली, भातशेतीची लागवड

नितेश राणे यांनी मूळ गावी वरवडेत केली, भातशेतीची लागवड

भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी आपल्या वरवडे गावातील शेतीमध्ये भातशेतीची लावणी केली.बैलांचे औत धरून आपण पिढीचा शेतकरी आहोत याचे प्रत्यंतर आणून दिले. आमदार नितेश राणे यांनी यांच्या शेतीत वावरण्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे वरवडे गावातील येवून शेती करत त्याची आठवण अनेक बुजुर्गना झाली.
आमदार नितेश राणे यांनी वरवडे गावातील आपल्या शेतीत सकाळपासूनच नांगरणीस सुरुवात केली. बैलांना नांगर जुंपून जमिनीची उखळ घातली त्याचप्रमाणे चिखली गेला त्यानंतर भात लावणी करण्यात आली यावेळी त्यांच्यासोबत गावातील शेतकरी आणि भात लावणी करण्यासाठी महिला भगिनी मदतीला होत्या.


कोकणात भात लावणीचा हंगाम असून समाधानकारक पडणाऱ्या पावसात सर्वच शेतकरी भाताची लावणी करताना दिसतात आमदार नितेश राणे यांचे वरवडे हे गाव असून त्या ठिकाणी त्यांच्या शेतीत भात लावणीचे काम सुरू आहे याच दरम्यान ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते भात लावणीचे काम सुरू असल्याने आज सकाळी नऊ वाजता वरवडे येथील शेतात गेले आणि शेतीच्या कामात हातभार लावला शेतीच्या बांधावर बसून त्यांनी न्याहारी सुद्धा केली.
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष गोट्या सावंत,पंचायत समिती माजी सभापती प्रकाश सावंत,भाजपा उपाध्यक्ष सोनू सावंत,महेश गुरव, आनंद घाडी,सुभाष मालंडकर, अशोक घाडी, दीपक घाडी, रामा निर्गुण, प्रकाश घाडी,सत्यवान निर्गुण,गणेश परब, सुरेश घाडी आदी सह गावातील शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 2 =