जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा न्यायालय परिसरात वृक्षारोपण
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्गच्या वतीने दिनांक ५ जून २०२६ रोजी जिल्हा न्यायालय सिंधुदुर्गच्या आवारात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी दिली आहे.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष, तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी वृक्षारोपणाचे महत्व पटवून देवून समाजातील प्रत्येकाने वृक्षरोपण करुन निसर्गाचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.
यावेळी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशापांडे, जिल्हा वधी सेवा प्राधिकरण प्र. सचिव, तथा दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) व मुख्य न्यायदंडाधिकारी, अतुल चेंडके, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) व अतिरिक्त न्यायदंडाधिकारी स्वाती पाटील, जिल्हा सरकारी वकील ॲड. एस.ए.राणे, ॲङ एस.वाय.गोबाडे, सहायक सरकारी अभियोक्ता तसेच लोक अभिरक्षक कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी, अधिक्षक, सहायक अधिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
