You are currently viewing कणकवली तालुक्यातून आयडियल इंग्लिश स्कूलची स्नेहल परब मृण्मयी गायकवाड व एसएम हायस्कूलचा आशिष भोसले प्रथम

कणकवली तालुक्यातून आयडियल इंग्लिश स्कूलची स्नेहल परब मृण्मयी गायकवाड व एसएम हायस्कूलचा आशिष भोसले प्रथम

आयडियल इंग्लिश स्कूलची तालुक्यात बाजी ; तालुक्याचा निकाल ९८.९७ टक्के

कणकवली

कणकवली तालुक्याचा बरावीचा निकाल ९८.९७ टक्के लागला. यात कणकवली वरवडे येथील आयडियल इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या तीन्ही क्रमांकावर बाजी मारली. यात स्नेहल राजेंद्र परब आणि मृण्मयी विजयानंद गायकवाड व एमएस हायस्कूल कणकवलीच्या आशिष सतिश भोसले या तीन विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ९३.१७ टक्के गुण मिळवुन विज्ञान शाखेतून कणकवली तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. तर याच आयडियल इंग्लिश स्कूलच्या विज्ञान शाखेतील अमृता अरविंद चोपडे ९२. ५० टक्के गुण मिळवुन तालुक्यात द्वितीय तर प्राची अनिल तायशेटये हिने विज्ञान शाखेत ९२.३३ टक्के गुण मिळवुन तालुक्यात तीसरा क्रमांक मिळविला.

प्रतिक्रिया व्यक्त करा