You are currently viewing सिंधुदुर्गातील प्राथमिक शिक्षण भरती प्रक्रियेकडे शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधणार

सिंधुदुर्गातील प्राथमिक शिक्षण भरती प्रक्रियेकडे शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधणार

दोडामार्ग डी. टी. एड संघर्ष समितीची बैठक; स्थानिकांवर अन्याय झाल्यास तीव्र आंदोलन…

दोडामार्ग

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामध्ये ८०० हून अधिक शिक्षक पदे रिक्त असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जिल्ह्यातीलच बेरोजगार डी.एड पदवी धारकांना सामावून घेण्यात यावे, अशी मागणी दोडामार्ग डी. टी. एड संघर्ष समितीच्या वतीने विजय फाले यांनी केली आहे. दरम्यान आता शिक्षण मंत्री सुद्धा सिंधुदुर्गचेच असल्याने जिल्ह्यातील तरुणांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांना प्राधान्य देऊन भरतीय प्रक्रिया राबविण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तर याबाबत श्री. फाले यांनी प्रसिद्धीपत्रक दिले असून शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामध्ये प्राथमिक शिक्षकांच्या सुमारे ८०० च्या वर रिक्त पदे असल्याचे समजते. तरी संबंधित पदांवर स्थानिक डी.एड बेरोजगार यांना सामावून घ्यावे, असे जिल्हयातील प्रत्येक डी. टी. एड धारकांचे स्पष्ट मत आहे. गेली दहा वर्षे भरती प्रक्रिया पूर्णपणे बंद असल्याने अनेक डी.टी. एड धारकांचे आयुष्य देशोधडीला लागले आहे. काहींची नोकरीची आयु मर्यादा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. आता विद्यमान शिक्षणमंत्री हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे असून स्थानिक असल्यामुळे आज जिल्ह्यातील तरुणांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे ही तरुणांची तळमळ, खदखद शिक्षण मंत्र्यांनी समजून घ्यावी, आणि स्थानिक डी.टी. एड धारकांची तात्काळ भरती करून स्थानिकांना न्याय द्यावा. शिवाय सध्या आंतरजिल्हा बद्लीसाठी शिक्षकांची मागणी पाहता विविध शिक्षक भरती आणि सी ई टी परीक्षा घोटाळ्यात सिंधुदुर्गच बोगस प्रमाण अत्यल्प असताना किंवा नसतानाही एक प्रकारे सिंधुदुर्गमधील भावी शिक्षकावरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष बाब म्हणून धोरण ठरउन डी टी एड़ धारकांना न्याय देण्याची मागणी शिक्षण मंत्री हे देतील अशी अपेक्षा बेरोजगारातून व्यक्त होत आहे. याबाबत नुकतीच समितीची विशेष बैठक पार पडली असून सुरुवातीला शिक्षण मंत्री यांची भेट व त्यानंतर पुढील रणनिती ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर भरती प्रक्रियेत स्थानिकांवर अन्याय झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − five =