You are currently viewing “ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेतेमंडळी प्रयत्न करू!” – आमदार अण्णा बनसोडे

“ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेतेमंडळी प्रयत्न करू!” – आमदार अण्णा बनसोडे

*”ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेतेमंडळी प्रयत्न करू!” – आमदार अण्णा बनसोडे*

पिंपरी

“ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा समाजाला खूप उपयोग होतो. त्यामुळे ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेतेमंडळी प्रयत्न करू!” असे आश्वासन आमदार अण्णा बनसोडे यांनी दिले; तर “ज्येष्ठांनी स्वतःसाठी वेळ काढावा; कारण आजच्या धकाधकीच्या काळात घरीदारी ज्येष्ठांना आजी – आजोबांची भूमिका पार पाडावी लागते. त्यामुळे त्यांनी विरंगुळा केंद्रात मन रमवावे!” असे आवाहन विधानपरिषद आमदार उमा खापरे यांनी आनंद ज्येष्ठ नागरिक संघ, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवड येथे केले. आमदार अण्णा बनसोडे, विधानपरिषद आमदार उमा खापरे, माजी नगरसेवक शीतल शिंदे, राजाभाऊ गोलांडे, ॲड. संदीप चिंचवडे, अजित गव्हाणे, सचिन वाल्हेकर, विक्रांत लांडे, शैला मोळक, आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, कार्याध्यक्ष प्रिया जोशी, उपाध्यक्ष अशोक नागणे, सचिव रवींद्र कुलकर्णी, खजिनदार रवींद्र झेंडे, कार्यकारिणी सदस्य शशांक देशपांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विरंगुळा केंद्राच्या नूतन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ज्ञानेश्वर खेडकर यांनी प्रास्ताविकातून, “‘आनंद घ्यावा, आनंद द्यावा!’ हे ब्रीद घेऊन आनंद ज्येष्ठ नागरिक संघ वाटचाल करीत आहे. सर्वपक्षीय नेतेमंडळींनी संघाला नेहमीच मदतीचा हात दिला. आज संघाची स्वतःची वास्तू झाली त्याचा अवर्णनीय आनंद झाला आहे!” अशा भावना व्यक्त केल्या.

दीपप्रज्वलन आणि श्रीराम, गणपती यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. वंदना बोरकर, सरिता कुलकर्णी, सरिता पाळंदे यांनी शारदास्तवन म्हटले; तर उमा पाडुळकर यांच्या महिला समूहाने स्वागतगीताचे गायन केले. कार्यक्रमानंतर सर्व सभासदांनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.

नृसिंह पाडुळकर, शशिकांत पानट, श्रीकांत कुलकर्णी, ज्ञानोबा कुसळ, प्रदीप वळसंगकर, शाम ब्रह्मे, सुनंदा माटे, कविता कोल्हापुरे, मधुरा गाडगीळ, अश्विनी कोटस्थाने, अशोक कपोले यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रिया जोशी यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र कुलकर्णी यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =