You are currently viewing चक्रीवादळाचा आर्थिक फटका वादळ ओसरल्यानंतरही…

चक्रीवादळाचा आर्थिक फटका वादळ ओसरल्यानंतरही…

*प्रेतावरच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार?…*

सिंधुदूर्ग :

नैसर्गिक आपत्तीचा गैरफायदा घेत,सिमेंट स्टील लोखंडी पत्रे इत्यादी साहित्य व्यावसायिक भरमसाठ दराने विक्री करत असल्याचा आरोप जिल्हा नियोजन समिती सदस्य हरी जगन्नाथ  कनयालकर यांनी केला आहे. याकडे त्यांनी जिल्हाधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

तौक्ते वादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात घर, गोटे,  शेत, मंगार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अन्य पत्रांच्या शेड ची छपरे उडून कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.काही घरांवर झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे घरे मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाली आहेत.

अश्या परिस्थितीत शासनाकडून अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. आपल्या घराची गोठ्याची शेतमांगराची दुरुस्ती व्हावी म्हणून कर्जाऊ रक्कम घेऊन सिमेंट व स्टील पत्रे खरेदी करण्यासाठी व्यावसायिकांकडे जात आहे. परंतु या वादग्रस्त परिस्थितीचा गैर फायदा घेऊन संबंधित व्यापारी बाजारभावापेक्षा अधिक दर लाऊन या आपदग्रस्थ कुटुंबाकडून लुटमार करत आहेत. त्यामुळे यावर नियंत्रण आणने महत्त्वाचे  आहे.

वादळापूर्वी स्टील चा प्रती किलो दर ५४ रुपये होता तो आता ६५ ते ७० रुपये झाला. JSW सिमेंटचे १० फुटी लांबीच्या पत्रांची किंमत ४००ते५००रुपये होती ती आता ५५५ ते ५६० रुपये केली आहे. अन्य स्टील चे दर डबल करण्यात आले आहे.

यात बहुसंख्य व्यावसायिक हे गुजराती व्यापारी आहेत यांना व्यवसायाचे दर ठरवून दिले आहेत तरीपण हे व्यावसायिक या परिस्थितीचा फायदा घेऊन जनतेची लूट करत आहेत म्हणून यावर त्वरित निर्णय घेणे गरजेचे आहे जिल्ह्यातील आपदग्रस्त गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा, असे जिल्हा नियोजन सदस्य तथा राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे ओबिसी सेल जिल्हाध्यक्ष हरी कनयालकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + eight =