You are currently viewing अवैध दारू वाहतुकीवर बांदा पोलिसांची मोठी कारवाई…!

अवैध दारू वाहतुकीवर बांदा पोलिसांची मोठी कारवाई…!

बांदा :

आलिशान कारमधून गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर बांदा पोलिसांनी कारवाई करत कारसह एकूण ६लाख १८ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला… याप्रकरणी प्रशांत सोमनाथ येरकळ (वय २५, रा. वरवंटी, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश पोवार यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा