You are currently viewing “दोडामार्ग मधील पराभवाची जबाबदारी स्वीकारून आमदारांनी राजीनामा द्यावा” ही मागणी म्हणजे राजकीय अपरिपक्वता

“दोडामार्ग मधील पराभवाची जबाबदारी स्वीकारून आमदारांनी राजीनामा द्यावा” ही मागणी म्हणजे राजकीय अपरिपक्वता

वरिष्ठ नेत्यांची कोपरखळी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणुकांचे निकाल लागले आणि त्यावर क्रिया प्रतिक्रियांचे वारे जोरदार वाहू लागले. गेल्या पाच सहा वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचे रूपांतर झाले आहे, परंतु त्या ग्रामपंचायतीत मतदारांची संख्या ही ग्रामपंचायत स्तरावरील मतदारांच्या संख्ये एवढीच आहे, त्यामुळे नगरपंचायत निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाने विजयाचा धुरळा उडवला तरी ग्रामपंचायत दर्जाच्या नगरपालिकेतील विजयावर व्यक्त होणाऱ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया या हास्यास्पद असल्याचेच दिसून येत आहे. “आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून” अशी तत्व ठेवून व्यक्त होणाऱ्या नेत्यांमुळे मात्र लोकांचे मनोरंजन होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला मालवण वगळता इतर नगरपंचायतींमध्ये दोडामार्ग व वैभववाडी या सर्वात कमी मतदार असलेल्या व नावालाच नगरपंचायती आहेत. ग्रामपंचायतींमध्ये देखील त्यापेक्षा जास्त मतदार एक एका वार्डमध्ये असतात हे सत्य आहे. असे असताना दोडामार्ग सारख्या १००/१२५ मतदार वॉर्डमध्ये असताना मिळालेल्या विजयानंतर सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग विधानसभेच्या जवळपास तीन लाख मतदारांमधून निवडून आलेल्या आणि एकवेळ १७/१७ नगरसेवक निवडून आणलेल्या आमदार दीपक केसरकरांचा राजीनामा मागणे म्हणजे राजकीय परिपक्वता. १०० मतदार वार्डाची नगरपंचायत कुठे? आणि ३.०० लाख मतदार संख्या असलेली आमदारकी कुठे? या अज्ञानावर काय बोलायचे? अशी कोपरखळी राज्यस्तरीय लेव्हल वर काम करणाऱ्या एका वरिष्ठ नेत्याने मारली आहे. त्यामुळे दोडामार्ग मधील पराभवाला काही अर्थ नाही.
एकीकडे दोडामार्ग, वैभववाडी नगरपंचायतीत मिळालेल्या यशाने आमदारांच्या राजीनाम्याची घोषणा करताना देवगडमध्ये मिळालेल्या अपयशाचा धनी कोण? हे मात्र जिल्ह्यातील एका मतदारसंघाच्या आमदारांचा राजीनामा मागणारे सोयीस्करपणे विसारल्याचे दिसत आहे, त्यामुळे ही दुपट्टी भूमिका न समजण्या एवढी जनता आज दुधखुळी राहिलेली नाही. परंतु पाच वर्षे आपल्याला लुटणाऱयांकडून एकदा मिळणारा फायदा घेण्यातच काही मतदार धन्यता मानत असल्याने दिसत आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये येणारे निकाल हे उमेदवारांच्या कर्तृत्वापेक्षा आर्थिक क्षमतेवर आधारित दिसतात. अशा निकालावर लोकप्रतिनिधींची वक्तव्ये ही विचारपूर्वक आली पाहिजेत, कारण सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आदींच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट जनतेपर्यंत क्षणात पोचते आणि कोण बोलतं? त्याला किती महत्त्व द्यायचं? हे लोक ठरवतात त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या अकारण आणि अपरिपक्व वक्तव्याची लोकच खिल्ली उडवतात. म्हणून लोकप्रतिनिधींची वक्तव्ये हे अपरिपक्व, बालिशपणाची न येता जबाबदारीने आली पाहिजेत.
जिल्हा पातळीवर ग्रामपंचायत असो वा नगरपंचायत स्थानिक नेते वरिष्ठांकडून मिळणाऱ्या आर्थिक रसदीवरच राजकारण करत असतात. या राजकारणातून केवळ जनतेचे लक्ष आपल्याला मिळालेल्या आकडेवारीकडे वेधून घेणे एवढाच उद्देश असतो. काहीवेळा ओले झालेल्या हातांमुळे तो सफल होतो परंतु अशाप्रकारे मिळालेल्या यशाचा आनंद टिकत नाही आणि विकासाला खंड पडला तरी विचारणारे कोणी उरत नाहीत. त्यामुळे राजकारणाची पातळी खूपच खालावलेली दिसत असून भविष्यात राजकारण हे सभ्य माणसांचे क्षेत्र नक्कीच राहणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two − one =