You are currently viewing ऋतु बहरला प्रेमाचा

ऋतु बहरला प्रेमाचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ऋतु बहरला प्रेमाचा*

 

हवी कशाला रंगीत छत्री

*ऋतु “बहरला” प्रेमाचा*

पुरेसा आहे पाऊस ओला

मोद होतो गरम श्वासाचा

१

काय कामाची छत्री सुकी

दंडावरची चोळी भिजली

बखोट धरता गोड लाजली

मुकी अबोली हळू बोलली

२

खांद्यावरती *ठेवता मान*

वात्रट वारा झाला बेभान

सोडून वेणी तिही बिलगली

देऊन गेली अनुभव महान

३

करून झाली विनंती मेघा

तोही बसला आता हटून

लागला बरसू मुक्तपणाने

गेली अबोली पुरी गारठून

४

जरी मोहरला आंबा जेष्ठात

कसा येईल तो *बहराला*

व्हायचे होते ते झाले शेवटी

बाबाने रस्ता मधे आडवला

५

नाईलाजाने देऊन ओळख

घेतली सुटका तेव्हा करून

माडीवरून आईने पाहिले

जाणायची ते गेली जाणून

६

विनायक जोशी🖋️ ठाणे

मोबाईल/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा