मुख्य वनसंरक्षकावर आर्थिक देवाण-घेवाणीचा आरोप…

मुख्य वनसंरक्षकावर आर्थिक देवाण-घेवाणीचा आरोप…

कणकवलीच्या तत्कालीन वनक्षेत्रपालाची तक्रार, वनविभागात खळबळ

सावंतवाडी

मेळघाट मधील महिला वनक्षेत्रपाल यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतनाच आता कणकवलीचे तत्कालीन वनक्षेत्रपाल दिपक सोनवणे यांंनी कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा प्रभारी कार्यभार माझ्याकडून तडकाफडकी काढून घेउन तो रत्नागिरीतील अधिका-यांकडे अर्थिक देवाण घेवाणीतून दिल्याचा गंभीर आरोप कोल्हापूर परिक्षेत्राचे मुख्यवनसंरक्षकावर केला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना लिहले असून, त्यांची प्रत त्यांनी मुख्यमंत्र्यानाही पाठवली आहे. या पत्राने वनविभागात खळबळ माजली असून,आता वरिष्ठ अधिकारी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा