You are currently viewing स्वप्नातलं जग

स्वप्नातलं जग

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री अंजली दीक्षित पंडित लिखित अप्रतिम लेख*

 

*स्वप्नातलं जग*

 

आपली स्वप्नं ही फक्त आणि फक्त आपलीच असतात, ती कुणालाही ऐकू अथवा दिसू शकत नाहीत हे अनेक अर्थाने बरेच आहे म्हणायचे.

विचार करा जर आपली स्वप्न कुणा दुसऱ्याला दिसली असती किंवा ऐकू आली असती जशी एखाद्याच्या डोळ्यावरून आपण त्याच्या मनात काय चाललंय हे ताडू शकतो तसं, तर काय झालं असतं बरं? सगळीकडे नुसता गोंधळच उडाला नसता तर हाहाकार माजला असता. गंमत जाऊ दे पण ही स्वप्नं म्हणजे माणसाला निसर्गानं दिलेली एक अद्भुत शक्ती किंवा वरदानच म्हणावे लागेल.

 

स्वप्न जी कधी पाहिली जातात मिटल्या डोळ्यांनी झोपेत, तर कधी उघड्या डोळ्यांनी दिवसा सुद्धा. स्वप्नं ही कधी एखाद्याचं जीवनध्येय असतं जसं स्वातंत्र्य पूर्व संग्रामात आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांनी पाहिलं. स्वप्नं जे शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेसाठी आणि स्वराज्यासाठी पाहिलं. स्वप्नं जी राजमाता जिजाऊंनी, राणी अहिल्यादेवींनी, सावित्रीबाई फुलेंनी , डॉ भीमराव आंबेडकरांनी पाहिली…अशी किती नावे घ्यावीत? अशी जाज्वल्य स्वप्ने पाहून ती सत्यात उतरवण्यासाठी झटणारे लोक आपल्या भारतभूमीवर होऊन गेले म्हणून आज आपण सुखात,आरामात जगू शकतो आहोत.

 

काही स्वप्ने दिवास्वप्ने असतात. म्हणजे केवळ कल्पनेची मनोराज्यं.

कधी कधी एखाद्याच्या स्वप्नाळू डोळ्यात कुणाचं प्रेम फुलत असतं. कुणाच्या आयुष्यात येण्यामुळे श्रावणाच्या सरीमध्ये मन चिंब भिजून जावं आणि दिवस दिवस फक्त त्या व्यक्तीचाच विचार करत रहावं… मग बघता बघता कल्पनेच्या सप्तरंगी इंद्रधनुष्याला स्वप्नांनी सुद्धा झुला बांधावा तसं त्या व्यक्तीच्या स्वप्नात येण्यानं मन मोहरून जावं. त्या स्वप्नांच्या प्रेमात पुन्हा पुन्हा पडावं,ती स्वप्नं कधी संपूच नयेत असंही वाटण्याचं एक वेडं वय येतं. या झुल्यावर बसून झोका घेतल्याशिवाय मग मनाला करमेनासच होतं. कल्पनांचे उंच उंच इमले बांधायला कुणाची परवानगी थोडीच लागते? आणि विशेष गंमत म्हणजे ते शेजारच्या व्यक्तीला कळत सुद्धा नाही. मग काय अशी गुलाबी गुलाबी स्वप्न पडायला आकाशातले चंद्र तारे, इंद्रधनुष्य, समुद्राच्या पोटातला अनमोल मोती, श्रावण सरी आणि काय काय अनुपम गोष्टी सुद्धा कमीच पडतील. ‌

 

पण खरं पाहायला गेलं तर स्वप्न ही एक रम्य कल्पना नगरीच आहे. कधी कधी ती आपल्याला खूप रम्य भासते म्हणजे खूप छान गोड गोड स्वप्न पडतात पण बऱ्याच वेळा अस्वस्थ करणारी, भीतीदायक, नकारात्मक अशी स्वप्न आपल्याला नकोशी वाटतात.

तज्ञांच्या मते जो काही आपण विचार करतो त्याचा बऱ्याच अंशी स्वप्नातल्या विषयाशी ताळमेळ असू शकतो. पण हा काही नियम नाही. आपण हे सुद्धा निरीक्षण केलं असेल की काहीही अतर्क्य, ज्यांचा आपण विचारही करत नाही त्या गोष्टी सुद्धा स्वप्नात येऊ शकतात. कधी एखाद्या वेळेस टीव्हीवर पाहिलेली निरर्थक गोष्ट सुद्धा स्वप्नात येऊन जाते.आणि दुसऱ्या बाजूला असेही दिसते की गत स्मृतींच्या पाऊलखुणा ठळकपणे स्वप्नात दिसतात. काही अभ्यासकांच्या मते स्वप्नात पाहिलेल्या गोष्टींवरून भविष्याचा अंदाज बांधता येऊ शकतो. काहींच्या मते आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी किंवा शरीरातील रोगही त्याला कारण ठरू शकतात. काही अभ्यासकांच्या मते रास किंवा ग्रहदशा कारणीभूत असू शकते.

आणि काहींना वाटतं की स्वप्न ही तद्दन फालतू असतात, निरर्थक असतात, त्यांना काहीही अर्थ नसतो.

 

कधी रात्री झोपेत पाहिलेली स्वप्न सकाळी आठवतात तर काही विसरून जातात. जेव्हा सारखी तीच तीच स्वप्नं पडतात तेव्हा आपण जागं होऊन त्यावर विचार करत बसतो. पण स्वप्न पडणं ही एक अतिशय नॉर्मल गोष्ट आहे. अतीथकव्याने,श्रमाने शरीर दमते.आपण झोपतो तेव्हा सगळे अवयव शिथील होऊन शरीराला विश्रांती मिळते.पण मेंदू झोपत नाही.दिवसभर घडलेल्या गोष्टींचे मेंदूत अनालिसिस चालूच राहते. त्याची एक चित्रमय मालिका तयार होत असावी आणि त्याच स्वरूपाच्या पूर्वी घडलेल्या घटनांचे धागेदोरे एकत्र मिसळून स्वप्न दिसत असावीत.

 

कारणं, अभ्यास आणि विज्ञान काहीही असो पण स्वप्न हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय आहे. चांगले विचार केले आणि चांगली स्वप्न पाहिली तर उद्या घडणाऱ्या घटना सुद्धा मनासारख्या घडून येतील आणि आयुष्य सफल होण्यासाठी ही स्वप्न निश्चितच प्रेरणादायी बनतील.

 

अंजली दीक्षित-पंडित

 

 

*संवाद मिडिया*

 

*💥ऑफर.. ऑफर…💥 दसऱ्यानिम्मित प्रभू कृषि सेवा केंद्र कुडाळकडून भव्य ऑफर..💥*

 

*Advt Link👇*

————————————————–

💥 *ऑफर…🥳 ऑफर…🥳 ऑफर…💥*

 

🍃 *!! विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!🍃*

 

💥 *प्रभू कृषि सेवा केंद्र, कुडाळकडून दसऱ्यानिम्मित भव्य ऑफर.. 😇💥*

 

▪️बॅटरी स्टार्ट ग्रास कटर

 

▪️चैन स्वा

 

▪️बॅटरी पंप

 

▪️वॉटर पंप

 

▪️पॉवर स्प्रेअर्स

 

👉 खरेदी वर 50% पर्यंत सूट💥

 

👉 आजच भेट द्या…🚶‍♂️

 

👉 *टीप : शासकीय अनुदानास सदर स्कीम लागू होणार नाही. नियम आणि अटी लागू*

 

🎴 *मे. प्रभू कृषि सेवा केंद्र, उदयमनगर, भोगटे कंपाऊंड कुडाळ*

 

📱 *संपर्क : 9423304173 / 7263832399*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 8 =