You are currently viewing वैभववाडी शहरातील सेल्फी पॉईंट चे आज उद्घाटन

वैभववाडी शहरातील सेल्फी पॉईंट चे आज उद्घाटन

आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी

कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीच्या माध्यमातून वैभववाडी येथील संभाजी चौकात सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहे. आज सायंकाळी ७ वाजता या सेल्फी पॉईंट चे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजपा पदाधिकारी, वाभवे- वैभववाडी नगरपंचायतचे सर्व नगरसेवक व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला शहरवासीयांनी उपस्थित रहावे असे आवाहन वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्षा नेहा माईनकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 16 =