You are currently viewing राज्यात 511 केंद्रांवर शनिवारपासून लसीकरण..

राज्यात 511 केंद्रांवर शनिवारपासून लसीकरण..

तर को-विन अ‍ॅपवर 7 लाख 84 हजारापेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी

पुणे
राज्यात कोरोना लसीकरणाला शनिवारपासून राज्यातील 511 केंद्रावर लसीकरणासाठी सुरुवात होणार असून सिरम इन्स्टियूटच्या कोविशिल्ड लशींच्या 9 लाख 63 हजार कुप्या प्राप्त झाल्या असून येत्या 2 दिवसांत केंद्रावर यांचा पुरवठा केला जाणार आहे.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास म्हणाले लसीकरणासाठी पहिल्या गटात आरोग्य कर्मचारी यामध्ये शासकीय व खाजगी आरोग्य संस्थामधील सर्व कर्मचारी, आशा,अंगणवाडी सेविका आदींचा समावेश आहे.तर एका ठिकाणी किमान 100 जणांना लसीकरण करण्यात येईल. या ठिकाणी वीज, इंटरनेट, वेबकास्ट आदी सुविधा करण्यात आल्या आहेत.तसेच लसीकरणासाठीच्या पथकामध्ये 5 सदस्यांचा समावेश असणार आहे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी दिली.

3 हजार 135 शीतसाखळी केंद्र:-

राज्यात राज्यस्तरीय 1, विभागीय स्तरावर 9, जिल्हास्तरावर 34, महानगरपालिका स्तरावर 27, असे शीतगृह तयार असून 3 हजार 135 शीतसाखळी केंद्र उपलब्ध आहेत. केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या 1200 व्हॅक्सिन कॅरियरचा पुरवठा जिल्हा व महापालिकांना करण्यात आला आहे.

लसीकरणासाठी जिल्हानिहाय केंद्रांची संख्या-

अहमदनगर-21 पुणे-55, नाशिक-23, औरंगाबाद-18, कोल्हापूर-20, अकोला-5,
अमरावती-9, बीड-9, भंडारा-5, बुलढाणा-10, चंद्रपूर-11, धुळे-7, गडचिरोली-7, गोंदिया-6, हिंगोली-4, जळगाव-13, जालना-8, लातूर-11, मुंबई-72, नागपूर-22, नांदेड-9, नंदूरबार-7, उस्मानाबाद-5 , पालघर-8, परभणी-5, रायगड-7, रत्नागिरी-9, सांगली-17, सातारा-16, सिंधूदुर्ग-6, सोलापूर-19, ठाणे-42, वर्धा-11, वाशिम-5, यवतमाळ-9 असे एकूण 511 केंद्र आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =