You are currently viewing आयुष्याच्या वाटेवर

आयुष्याच्या वाटेवर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास अण्णा लिखित अप्रतिम काव्यरचना*

*आयुष्याच्या वाटेवर*

आयुष्याच्या वाटेवर मी
कधी हसत होतो
कधी रडत होतो
दोन्ही गोष्टी पाहून
तसाच घडत होतो

आयुष्याच्या वाटेवर मी
कधी बसत होतो
कधी चालत होतो
कधी शांत मुद्रेत तर
कधी बोलत होतो

आयुष्याच्या वाटेवर
सुख आणि दुःख दोन्ही
पाहून आनंदी आहे
असा मी अव्यक्त पण
जो स्वच्छंदी होतो

कधी चंद्र झालो तर
मी कधी इंद्र झालो
कधी रवी सुध्दा झालो
पण आज कवी झालो

आयुष्याच्या वाटेवर
आयुष्याच्या वाटेवर

रामदास आण्णा

प्रतिक्रिया व्यक्त करा