You are currently viewing पारिजात

पारिजात

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका, कवयित्री सौ.भाग्यश्री कुलकर्णी यांची काव्यरचना

मोहक गंध लेवून फुले
मोतिया दवात भिजे अंग
पारिजात बहरला दारी
माळून शुभ्र केशरी रंग

पाकळ्या नाजुक उमलती
मंद दरवळे परिमळ
क्षणभंगुर जीवन त्याचे
परी गंधीत करी ओंजळ

भाव समर्पणाचा सदैव
असे निरंतर याच्या ठायी
मातीलाही गंध तव देई
प्रभात ही मोहरुन जाई

उमले पारिजात पानोपानी
गंधाळतो परिसर सारा
लयलुट सुगंधाची ऐसी
क्षण प्रसन्न भासणारा

सौ. भाग्यश्री कुलकर्णी
पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा