You are currently viewing सर पावसाची

सर पावसाची

सहाक्षरी रचना

सर पावसाची
मन भिजवते
ओलेत्या अंगात
कंपण आणते

सुटे गार वारा
काटा अंगावर
सुगंध मातीचा
दरवळ फार

बरसले ढग
मना मनावर
भिजवले अंग
भिजले शिवार

झाली लगबग
वाट पाही शेत
चिखलात राजा
धरतोय जोत

नदीनाले वाहे
हिरवे डोंगर
गोरगरीबांनी
शिवले मांगर

पेटती काजवे
रातीच्या अंधारी
सांज होता राया
फिरती माघारी

टेकले आकाश
भासे डोंगरास
पाणी थेंब थेंब
सुख धरणीस.

(दिपी)✒️
©दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 15 =