You are currently viewing सावल्यात फसले

सावल्यात फसले

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री.अरविंदजी ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना

तू पाहताच हंसूनी नकळत वयात आले
अस्फूट भावनांच्या अलगद कह्यात गेले

नव्हता मला सुगावा या चोर पावलांचा
मी एकदाच कधी मग सांवल्यात फसले

तू बोललास कानी यालाच म्हणती प्रीती
आकाश मोकळे तरी मी चांदण्यात न्हाले

दवबिंदु सुखाशांचे जरी नयनात साठलेले
हातात हात देता क्षणी पांपण्यात मिटले

अंधार भोवती हा घन संकोच दाटलेले
स्पर्शात वीज चमके तें बरसण्यात विरले

नाते असे क्षणांचे बघ बनते कसे युगांचे
तू मला अन मी तुला वय सांगण्यात सरले

तू पाहताच हंसुनी मी नकळत वयात आले

*अरविंद*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − four =