You are currently viewing कलंबिस्त हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा..

कलंबिस्त हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा..

नुतन शैक्षणिक संकुलातील एका वर्गखोलीच्या फ्लोरींगचे काम पूर्ण करीत ठेवला आदर्श…

सावंतवाडी

कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या शैक्षणिक वर्ष १९९३-९४ च्या बॅचचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.सुर्वे सर व कै.एस्.व्ही.पाटील सर यांच्या प्रेरणेतून त्यांनी आपल्या बॅचचा वॉट्सअॅप गृप स्थापन करीत आर्थिक सहयोगातून हायस्कूलच्या नुतन शैक्षणिक संकुलातील एका वर्गखोलीच्या फ्लोरींगचे काम पूर्ण करुन सर्व माजी विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श ठेवला. त्याचप्रमाणे पुणे येथील एका संस्थेच्या माध्यमातून मुलींच्या स्वच्छतागृहासाठी पंच्याहत्तर हजार रु. एवढी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नकेले.या स्नेहमेळाव्यासाठी या बॅचमधील सतिश सावंत,कल्पना पास्ते, महेश मडगावकर,विजय मडगावकर, संजिव पालकर,विष्णू राऊळ, महेश राऊळ,दिपक राऊळ,आप्पा घाडी, सुधाकर कुडतरकर,प्रविण कुडतरकर,अनिल देसाई,सोनू आईर,सोमकांत सावंत,संजिव सावंत,सुरज पवार आदी उपस्थित होते. या सर्व माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करुन प्रशालेविषयी आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. आज या नुतन शैक्षणिक संकुलातील तळमजल्यावरील सर्व वर्गखोल्यांच्या फ्लोरिंगचे काम पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले व शाळेच्या विकासासाठी आपण नेहमीच कटीबद्ध राहू असे त्यांनी आश्वासन दिले. या कार्यक्रमाला प्रशालेचे वरीष्ठ लिपीक विष्णू पास्ते, रविकमल सावंत, रोहित पास्ते उपस्थित होते. प्रशाले मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी या स्नेहमेळाव्याला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या व सर्व उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =