You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये सादर केलेले जागतिक छायाचित्रण दिन व त्यांच्या बुद्धीला चालना देणारे सत्र

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये सादर केलेले जागतिक छायाचित्रण दिन व त्यांच्या बुद्धीला चालना देणारे सत्र

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये या शैक्षणिक वर्षापासून एक नवीन माहितीपूर्ण सत्र सुरू केले गेले. ते म्हणजे ‘एस्.एस्.जी. थिंक टॅंक्स.’
२६ ऑगस्ट २०२२ या दिवशी या सत्राच्या निमित्ताने व जागतिक छायाचित्रण दिवस या दिनानिमित्त प्रसिद्ध छायाचित्रकार श्री. सिद्धेश रेडकर ‘ यांना विद्यार्थ्यांकरिता छायाचित्रण दिनाचे महत्त्व कळावे व विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळाली म्हणून शाळेमध्ये आमंत्रित केले गेले.
या सत्राच्या सुरुवातीला शाळेचे संचालक श्री. रुजूल पाटणकर व सौ. काश्मिरा पाटणकर , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत व प्रसिद्ध छायाचित्रकार श्री. सिद्धेश रेडकर यांचे स्वागत करण्यात आले. या दिवशी सिद्धेश रेडकर यांनी इ.३री व इ. ४ थी च्या विद्यार्थ्यांना छायाचित्रणाविषयी मूलभूत ज्ञान संपादन केले. यामध्ये छायाचित्रणाकरिता कॅमेराचा वापर कसा केला जातो, कॅमेराच्या लेंसेस तसेच छायाचित्र काढण्यासाठी आपली निरीक्षण क्षमता तीव्र असणे गरजेचे आहे ही महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. दूर अंतरावरचे फोटो काढण्यासाठी व जवळच्या अंतरावर असलेली व्यक्ती किंवा वस्तूंचे फोटो काढण्यासाठी कॅमेराचा कसा वापर केला जातो. त्याचप्रमाणे, मोबाईलचा छायाचित्रणासाठी केला जाणारा वापर व कॅमेऱ्याच्या माध्यमाने छायाचित्रणासाठी केला जाणारा वापर यामधील फरक त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचे निरसन प्रश्नोत्तरे व चर्चेच्या माध्यमाद्वारे करण्यात आले. व कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतर्फे विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रसिद्ध छायाचित्रकार श्री. सिद्धेश रेडकर यांना लहानशी भेट म्हणून वृक्ष देण्यात आले. व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अशाप्रकारे हे सत्र विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या बुद्धीला चालना देणारे असे प्रभावी सत्र ठरले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × two =