You are currently viewing यंदा ढोल ताशा पथकांवर निर्बंध नाहीत..

यंदा ढोल ताशा पथकांवर निर्बंध नाहीत..

 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून यंदा पुणे शहरात ३५६६ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि ४ लाख ५४ हजार ६८६ घरगुती गणपतीची संख्या असणार आहे. गणेशोत्सव सुरळीत पार पडावा, याकरिता साडेसात हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी यंदा गणेश मंडळांनी किती ढोल ताशा पथके ठेवावीत. यावर निर्बंध असणार नाही, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, राजेंद्र डहाळे,पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, राहुल श्रीरामे, ए राजा उपस्थित होते. पुण्यात बंदोबस्ताकरिता बीडीडीडी पथके, क्युआरटीचे अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत.

वाहतूक नियंत्रणाकरिता वाहतूक शाखेकडील अधिकारी व कर्मचारी यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. पुणे शहरात गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, याकरिता १७०९ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =